खानापूर विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात ; आज एकही अर्ज.....?
05:42 PM Oct 22, 2024 IST | Admin@Master
Advertisement
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २९ ऑक्टोबर आहे. तर दिनांक ३० रोजी उमेदवारी अर्जाची छाननी आहे. दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी माघार घेण्याची मुदत असून दिनांक २० रोजी मतदान व २३ रोजी मतमोजणी असणार आहे.
Advertisement
खानापूर विधानसभेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, दिनांक २२ रोजी ३.०० वाजे पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सकाळी ११ पासून दुपारी ३.०० पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. परंतु एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती खानापूर विधानसभेचे निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दिली.
Advertisement
Advertisement
Advertisement