ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

‘हे’ आहे वंचित बहुजन आघाडीच निवडणूक चिन्ह; घ्या जाणून

03:20 PM Aug 16, 2024 IST | Mandesh Express

अॅड. प्रकाश आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुका लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडी  पक्षाचेच निवडणूक चिन्ह अखेर निश्चित झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला निवडणूका लढण्यासाठी 'गॅस सिलेंडर' (Gas Cylinder) हे चिन्ह दिले आहे. आगोयाच्या सचिवालयाने त्याबाबतचे पत्र नुकतेच पक्षाला दिले. त्यामुळे या पक्षाला एकाच निवडणूक चिन्हावर राज्यभरात विविध प्रकारच्या निवडणुका लढवता येणे शक्य झाले आहे. या चिन्हामुळे पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या प्रक्रियेत आणि उमेदवारांच्या ओळखीमध्ये निश्चित स्वरुाची सुसूत्रता येणे शक्य होणार आहे. पक्षाने आपल्या सोशल मीडिया मंचावरुन चिन्हाबाबत माहिती दिली आहे.

कामगिरी सुमार पण टक्का उत्तम
वंचित बहुजन आघाडीने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने ने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर चिन्ह दिले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पाठिमागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरील विविध निवडणुकांमध्ये सक्रीय सहभाग घेत आली आहे. या निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी तिथकीशी समाधानकारक केव्हाच राहीली नाही. असे असले तरी, पक्षाने आपला मतदारांचा विशिष्ठ टक्का मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार राज्यात कायम असल्याचे नेहमीच स्पष्ट झाल्याचे पाहायला मिळत होते. असे असले तरी पक्षाला अद्यापही निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते. परिणामी एकाच निवडणुकीत पक्षाला वेगवेगळ्या चिन्हावर उमेदवार उभे करावे लागत होते.

 

Tags :
गॅस सिलेंडरवंचित बहुजन आघाडी
Next Article