ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळालं तिकीट

01:26 PM Oct 27, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत 38 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. तर आज रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आले आहे.

यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून आतापर्यंत ४९ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडीत, फलटण मतदार संघातून सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेर मतदार संघातून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.

Tags :
MLA DIlipkaka BankarNCP Ajit PawarParner Kashinath DatePhaltan Sachin PatilSunil TatkareVijaysinh Pandit
Next Article