ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली

10:29 PM Sep 27, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

 

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं महिलेचं नाव असून ही महिला घरी एकटीच राहते. आई वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत. बहीण लग्न करून निघालेली आहे. सदर महिलेने काल रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला. सीसीटीव्हीमार्फत महिलेची ओळख पटली आहे. फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आहे. सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते. तिच्या अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

 

अभिनेता सलमान खानसोबत मला लग्न करायचंय, नंबर द्या..
संबंधित महिला यापूर्वी सुद्धा मंत्रालयात अनेकदा आली होती. मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ती करीत असते. अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते. यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.

 

 

 

Tags :
attacked-Devendra-Fadnavis'-office-has-been-identifiedDeputy-Chief-Minister-Devendra-FadnavisDevendr_Fadanvis
Next Article