ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

सणासुदीच्या दिवसातील गरिबांचा आनंद हरपला! 'आनंदाचा शिधा योजना' बंद

05:10 PM Mar 11, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस/ मुंबई : राज्यातील गरिबांसाठी सणासुदीच्या दिवसात आधार असणारी आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्यात आली आहे. राज्यातील निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या योजना लागू केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास 1 कोटी 63 लाख लाभार्थींना झाला होता. आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

 

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आनंदाची शिधा, तीर्थाटन योजना अशा काही योजना सरकारकडून बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातील आनंदाची शिधा योजना आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना लागू करण्यात आली होती. राज्यातील विविध सणाच्या निमित्ताने या योजनेत लाभार्थींना अवघ्या 100 रुपयांत पाच वस्तू घरपोच मिळत होत्या. त्यामुळे किमान काही अंशी दिलासा गरिबांना मिळत होता. आता मात्र ही योजना बंद करण्यात आली आहे.

Tags :
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारआनंदाचा शिधा योजना बंदउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next Article