For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

लोकांनीच ठरवलय, सरकार बदलायचं हाय, वैभवदादालाचं आमदार करायचे आहे : माजी आमदार सदाशिव पाटील

07:34 PM Nov 14, 2024 IST | Admin@Master
लोकांनीच ठरवलय  सरकार बदलायचं हाय  वैभवदादालाचं आमदार करायचे आहे   माजी आमदार सदाशिव पाटील
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : लोकांनीच ठरवले आहे. सरकार बदलायचं हाय, वैभवदादालाचं आमदार करायचा आहे. कोणता नेता कुठे गेला, जाऊ द्या. हा खोक्यांचा आणि पॅकेजचा फंडा आहे. मतदार संघातील छोटे-मोठे नेते विकले गेले आहेत. भाजप सरकारने आमदारांचा बाजार भरवला होता. त्याचे लोन आता मतदार संघातील ग्रामीण भागातील छोट्या - मोठ्या नेत्यापर्यंत आले आहे. खोक्यांचा वापर करून नेते खरेदी केले जात आहेत. मात्र सामान्य जनता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी केले.

Advertisement

खानापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

Advertisement

पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी पक्षाचे काही पदाधिकारी नेते खोक्यांच्या आणि पॅकेजच्या आमिषाने दलबदलूपणा करत आहेत. त्याची पक्षीय पातळीवरती दखल घेतली जात आहे. पक्षनिष्ठेला तिलांजली देणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या नेत्यांना जनता धडा शिकवणार आहे. जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या मताचे मालक होणारे आणि स्वतःचं घर भरणारे नेते पुढील काळात सामान्य लोकांच्या नजरेला नजर भिडवू शकणार नाहीत. जनता एवढी दुधखुळी नाही. आता ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे वैभवदादा पाटील यांचा विजय निश्चित आहे.

Advertisement

शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक आणि विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांचे विश्वासू सहकारी विठ्ठल साळुंखे म्हणाले, लोकांनी गैरसमज करून घेऊ नका. विश्वजीत कदम यांच्याबरोबर त्यांचे सर्व कदम कुटुंबीय आमदार सदाशिवभाऊ पाटील व वैभवदादा पाटील यांच्याबरोबर आहेत. कोणीतरी अफवा पसरवत आहे. विश्वजीत कदम यांचा त्यांच्या मतदारसंघात प्रचार दौरा सुरू असल्याने ते आपल्या मतदारसंघात आले नाहीत. परंतु ते 17 नोव्हेंबरच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित राहून काँग्रेसच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना वैभवदादा पाटील यांचं झाडून काम करण्याचे आदेश देणार आहेत. त्यामुळे कोणीही अफवावरती विश्वास ठेवू नका.

Advertisement

महाविकास आघाडीमधील सर्व छोट्या -मोठ्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म काटेकोरपणे पालन करायचा आहे. कोण काय म्हणतोय याच्यावरती विश्वास न ठेवता. प्रामाणिकपणे काम करायचं आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन काम करायचा आहे.

Advertisement

स्वागत प्रास्ताविक संतोष जाधव सर यांनी केले. यावेळी चंद्रहार पाटील, शिवसेनेचे संजय विभुते, शिवाजी शिंदे, संजय मोहिते, माजी तालुका पंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजूशेठ जानकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीश लोखंडे सानिका शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली.

या सभेला नितीनराजे जाधव, सरपंच मानसिंग जाधव, माजी सरपंच रघुनाथ पवार, माजी सरपंच अरविंद गायकवाड, दशरथ गायकवाड, तांदळगावचे अजित पवार, बलवडीचे प्रशांत पवार, जयसिंग शिंदे, केशव पाटील, तुषार शिंदे कादर मुजावर, शिवाजीशेठ सुर्वे, जयकर साळुंखे, हिफजू मुल्ला आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags :