ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

माजी उपसभापती व भाजपच्या माजी तालुकाध्यक्ष यांच्या प्रवेशाने सुहास बाबर यांना मोठं बळ

10:12 AM Nov 10, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज :  आटपाडी/प्रतिनिधी : खानपूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना आटपाडी तालुक्यातून मोठे बळ मिळाले आहे. भाजपचे आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजीशेठ यमगर व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सुहास बाबर यांना आटपाडी तालुक्यातून सुहास बाबर यांचे पारडे जड झाले आहे.

 

खानापूर विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेच्या तिकीटावर स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना निवडणूक लढवीत आहे. तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैभव पाटील हे निवडणुकीच्या निवडणूक रिंगणात आहेत. सुहास बाबर व वैभव पाटील हे दोन्ही उमेदवार खानापूर तालुक्यातून आहेत. तर आटपाडी तालुक्यातून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

आटपाडी तालुक्यात एकच उमेदवार असल्याने वैभव पाटील व सुहास बाबर यांच्यासमोर राजेंद्रआण्णा देशमुख यांनी मोठे आव्हान निर्माण केले असल्याने, तानाजी यमगर व प्रभाकर पुजारी यांच्या प्रवेशाने सध्या तरी सुहास बाबर यांना मोठे बळ मिळाले आहे. या प्रवेशावेळी शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, अमोल बाबर, दिघंची माजी सरपंच अमोल मोरे, दत्तात्रय पाटील (पंच), मनोज नांगरे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Tags :
Khanapur AssemblyKhanapur Atpadi Assembly ConstituencyKhanapur Legislative AssemblyKhanapur-Atpadi-AssemblyMLA Rajendranna DeshmukhSuhas BabarSuhasbhaiyai emotional
Next Article