ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

धक्कादायक! उदयपूरमध्ये विद्यार्थ्यावर चाकूने वार, विद्यार्थी गंभीर जखमी,कलम 144 लागू

11:59 AM Aug 17, 2024 IST | Mandesh Express

 

शुक्रवारी उदयपूरच्या सूरजपोल पोलीस स्टेशन परिसरात दोन शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, चाकू हल्ला झाल्याची घटनाही समोर आली आहे. या चाकूच्या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सूरजपोल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही वेळातच हिंदू संघटनांशी संबंधित हजारो कार्यकर्ते रुग्णालयाच्या इमर्जन्सी गेटवर पोहोचले आणि जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा मोठा ताफा रुग्णालयात पोहोचला.या घटनेनन्तर काही लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. अग्निशमनच्या दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. शहरात कलम 144 लागू करण्यात आली आहे.

 

Tags :
चाकूनेहल्ला
Next Article