ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाजपचे माजी आमदार यांच्या भेटीने खानापूर मतदार संघात मोठी राजकीय खळबळ

12:46 PM Sep 08, 2024 IST | Mandesh Express

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी आटपाडी-खानापूर मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांची भेट घेतली असून या भेटीने सध्या आटपाडी-खानापूर मतदार संघामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

 

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाकडून आपापल्या पक्षाला जास्त जागा मिळवून, जास्तीत-जास्त आमदार निवणूक आणण्यासाठी विडा उचलला आहे. खानापुर विधानसभा मतदार संघामध्ये कै. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनाने बरीच उलथापालथ झाली आहे. अनेक इच्छुकांनी मतदार संघामध्ये दौरे आखत मतदार संघ पिंजून काढला आहे.

 

या मतदार संघातून निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर, (Suhas Babar) भाजपकडून ब्रम्हानंद पडळकर, (Brmhanand Padalkr) राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वैभव पाटील (Vaibhav Patil) हे प्रमुख दावेदार आहेत. परंतु आता या इच्छुकांमध्ये आटपाडी तालुक्याचे नेते माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख (Rajendranna Deshmukh) यांची भर पडली असून त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर प्रचार सुरु केला आहे. आता हे सर्वजण महायुतीमध्ये असल्याने, यातील एकाला तिकीट मिळणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तिकीटासाठी रस्सीखेच पहावयाला मिळणार आहे.

 

 

महायुतीमध्ये दावेदार जादा असले तरी, महाविकास आघाडीमध्ये मात्र सध्या तरी कोणीच इच्छुक नसल्याने महाविकास आघाडीने आपले जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते  (Sanjay Vibhute) यांनी आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांची सूतगिरणी येथे भेट घेतली असून या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. निवडणुका जवळ आल्याने भाजपच्या राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या भेटीला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आल्याने सध्या तरी मतदार संघामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

 

 

Tags :
Brmhanand PadalkrKhanapur Atpadi Assembly ConstituencyRajendranna DeshmukhSanjay VibhuteSuhas BabaVaibhav Patil
Next Article