शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; खानापुरात कुणाला संधी?
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्याच चुकीतून सावरुन महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेत उमेदवारही निश्चित केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.
खानापुरात सुहास बाबर यांना संधी
खानापूर विधानसभेमधून स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र जिल्हा परिषेदचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांना मुख्यमंत्री अपेक्षेप्रमाणे संधी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी त्यांना साथ दिली होती. परंतु या बंडामध्ये स्व. अनिलभाऊ बाबर यांचे मोठे योगदान होते. अनिलभाऊ बाबर यांचे निधन झालेनंतर त्यांच्या पश्चात सुहास बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ यांनी मोठी ताकद दिली होती. मतदार संघातील विकासकामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी दिली होता.