ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर ; सांगली जिल्ह्यात भाजपच्या दोघांना उमेदवारी

09:43 AM Oct 25, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी अजित पवार गटात दिग्गजांचे पक्षप्रवेश पार पडले.

सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला असून त्यांना तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी देखील भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आम. जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज देण्यात आली आहे. त्याच बरोबर भाजपचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला असल्याने यामुळे तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात मोठा फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

अजित पवार गटाची दुसरी यादी
इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटी,ल अणुशक्तीनगर – सना मलिक, वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, वडगाव शेरी – सुनील टिंगरे,  शिरुर- ज्ञानेश्वर कटके, लोहा – प्रताप चिखलीकर

Tags :
Ajit Pawarajitrao ghorpadeNCP Ajit PawarNishikant PatilSanjaykaka patilTasgaon Kavthemahankal Constituency
Next Article