For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

सांगली : मालगावच्या माय-लेकीची दुर्दैवी आत्महत्या : किरकोळ वादातून कृष्णा नदीत उडी घेऊन संपवले जीवन

11:05 AM Jun 28, 2025 IST | Admin@Master
सांगली   मालगावच्या माय लेकीची दुर्दैवी आत्महत्या   किरकोळ वादातून कृष्णा नदीत उडी घेऊन संपवले जीवन
Advertisement

सांगली : मालगावच्या माय-लेकीची दुर्दैवी आत्महत्या : किरकोळ वादातून कृष्णा नदीत उडी घेऊन संपवले जीवन

Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्यूज

Advertisement

सांगली : मालगाव (ता. मिरज) : किरकोळ कौटुंबिक वादाचे दुर्दैवी पर्यवसान आत्महत्येत झाल्याची हृदयद्रावक घटना मालगाव येथे घडली आहे. येथील दीपाली अमित खांडेकर (वय 35) आणि तिची मुलगी प्राची अमित खांडेकर (वय 16) यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.

Advertisement

किरकोळ वाद, टोकाचे पाऊल

Advertisement

दि. 15 जून रोजी घरात किरकोळ वाद झाल्यानंतर माय-लेकी अचानक घरातून निघून गेल्या होत्या. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र काही ठिकाणी माहिती न मिळाल्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मिरज येथील कृष्णाघाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघी दिसून आल्याने त्यावरून पोलिसांनी कृष्णा नदी परिसरात शोधमोहीम सुरू केली. रेस्क्यू फोर्सच्या सहाय्याने नदीत शोध घेण्यात आला. मात्र, सुरुवातीला दोघी सापडल्या नव्हत्या.

Advertisement

प्राचीचा मृतदेह रायबाग येथे सापडला

२० जून रोजी कर्नाटकातील रायबाग येथे कृष्णा नदीपात्रात एका अज्ञात मुलीचा मृतदेह आढळून आला. रायबाग पोलिसांनी चौकशी करून नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र संपर्क न झाल्याने त्यांनी तेथेच अंत्यसंस्कार केले. नंतर ती प्राची खांडेकर असल्याचे उघडकीस आले.

आईचा मृतदेह म्हैसाळ येथे

यानंतर गुरुवारी (२७ जून) म्हैसाळ येथील बंधाऱ्याजवळील कृष्णा नदीपात्रात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह आढळून आला. विशेष बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. घटनास्थळाच्या व परिसरातील परिस्थितीचा अभ्यास करता, मिरज येथून कृष्णाघाट परिसरातून मायलेकींनी नदीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलीस तपास सुरूच

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मालगाव गावात हळहळ व्यक्त होत असून, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिरज ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Tags :