ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

सांगलीत पुन्हा 'सांगली पॅटर्न' ; खासदार विशाल पाटलांचा बंडखोर उमेदवाराला पाठींबा

05:54 PM Nov 05, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्यूज : सांगली : सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा 'सांगली पॅटर्न' चर्चेत आला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी, पुन्हा एकदा काँग्रेस विरोधी भूमिका घेतली असून, काँग्रेसचे सांगली विधानसभेचे अधिकृत उमेदवार असताना बंडखोर उमेदवाराला पाठींबा दिला आहे.

 

सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये ही लढत होत आहे. आज (मंगळवारी) जयश्री पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत भव्य सभा सांगलीच्या काँग्रेस कमिटी समोर घेण्यात आली. यावेळी या सभेला खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री प्रतिक पाटील हेही उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, मी सर्वांची क्षमा मागतो. जयश्री वहिनी यांना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदमसाहेब आणि मी कमी पडलो. आमच्या वसंतदादा कुटुंबाकडून काय चूक झाली की एकदा ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. निष्ठा आम्ही सोडली नाही. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला. हा अन्याय का होत गेला हेअद्याप कळू शकले नाही.

 

जयश्री वहिनी माझ्या उमेदवारी सर्वात पुढे होत्या मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये, अशी शंका निर्माण झाली. ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच विकास आघाडीचा घटक आहे.

 

काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करण्यासारखा सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे. आणि हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे.

 

Tags :
Jayshri Madan PatilMP Vishal Patil Sanglipratik patilPruthviraj Pati SangliSangli ConstituencyVishal Patil Support rebel Jayashree Patil
Next Article