For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

लाडक्या बहीण योजने बाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, म्हणाले......

11:00 PM Aug 23, 2024 IST | Mandesh Express
लाडक्या बहीण योजने बाबत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  म्हणाले
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत बँक खात्यात जमा होणारे पैसे लाभार्थीला कधीही काढता येणार आहे. लाभार्थ्याने हे पैसे न वापरल्यास परत जातील अशा आशयाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाभार्थी हे पैसे रोख, एटीएम तथा अन्य डिजिटल माध्यमांद्वारे आपल्या खात्यातून केव्हाही काढू शकतात, त्यामुळे लाभार्थ्यांनी जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हयातील लाभार्थ्यांना केले आहे.

Advertisement

Advertisement

या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश ,महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे तसेच कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे असा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थीच्या खात्यात १४ऑगस्टपासून पैसे जमा होऊ लागले आहेत. लाभार्थींचा आधार क्रमांक यापूर्वी थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँकेच्या खात्याशी जोडलेला असल्यास तो जोडण्यासाठी पुन्हा बँकेत जाण्याची गरज नाही.आधार क्रमांक कोणत्या बँकेच्या खात्याशी जोडलेला आहे हे

Advertisement

Advertisement

https://resident.uidai.gov.in/bank - mapper लिंकद्वारे घरबसल्या ऑनलाईन तपासात येईल तसेच या कामात गावातील अंगणवाडी सेविका, बँकेचे बीसी अथवा अन्य तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेता येईल. त्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) महिलांना मदत या उद्देशासाठी असून कोणत्याही थकीत कर्जाच्या किंवा इतर सेवा शुल्काच्या बदल्यात कपात केले जाऊ नये अन्यथा दोषी बँकावर कडक कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Advertisement

Tags :