ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

खानापूर मतदार संघात तब्बल 'एवढ्या' अर्जांची विक्री , तर जिल्ह्यात 'या' मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल

10:02 PM Oct 22, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आज 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले. श्री. नदीम नजरूद्दीन तांबोळी (रा. सावळज, ता. तासगाव) यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले. जिल्ह्यातील 287-तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर, खानापूर विधानसभा मतदारसंघात 25 व्यक्तिंना 59 अर्ज विकत घेतले आहेत.

 

नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीची अर्ज विक्री पुढीलप्रमाणे - 281-मिरज विधानसभा मतदारसंघात 27 व्यक्तिंना 52 अर्ज विक्री, 282-सांगली विधानसभा मतदारसंघात 23 व्यक्तिंना 35 अर्ज विक्री, 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 4 व्यक्तींनी 7 अर्ज विक्री, 284-शिराळा विधानसभा मतदारसंघात 9 व्यक्तिंना 15 अर्ज विक्री, 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात 10 व्यक्तिंना 23 अर्ज विक्री, 286-खानापूर विधानसभा मतदारसंघात 25 व्यक्तिंना 59 अर्ज विक्री, 287-तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 30 व्यक्तिंना 50 अर्ज विक्री, 288-जत विधानसभा मतदारसंघात 12 व्यक्तिंना 23 अर्ज विक्री झाली.

 

 

Tags :
Khanapur ConstituencySale of 59 applications in Khanapur Constituency
Next Article