ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडीत सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

01:40 PM Nov 14, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उद्या दिनांक १५ रोजी दुपारी २.०० वाजता आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन येथे संपन्न होणार आहे.

खानापूर मतदार संघातून महायुतीकडून सुहास बाबर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर, महायुतीमधून शिवसेनेकडून सुहास बाबर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदार संघामध्ये सुहास बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

आटपाडी तालुक्यात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असल्याने मतदार संघातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन येथे मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणत गर्दी होणार असल्याने, महायुतीच्या कार्यकर्त्याकडून जोरदार तयारी सुरु आहे.

 

 

Tags :
CM Eknath ShindeKhanapur AssemblyKhanapur Atpadi Assembly ConstituencyKhanapur-Atpadi-AssemblySuhas Babar
Next Article