For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

खरसुंडीत अपक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या यांच्या प्रचारार्थ जि.प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची जाहीर सभा

05:26 PM Nov 16, 2024 IST | Admin@Master
खरसुंडीत अपक्ष राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या यांच्या प्रचारार्थ जि प चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची जाहीर सभा
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर-आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्हया परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची जाहीर सभा आज दिनांक १६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता खरसुंडी येथील जोगेश्वरी मंदिर परिसरात संपन्न होणार आहे.

Advertisement

Advertisement

खानापूर मतदार संघातून अपक्ष म्हणून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. याठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीकडून वैभव पाटील व सुहास बाबर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदार संघातून तिरंगी लढत होणार आहे. सध्या तरी अपक्ष उमेदवार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे.

Advertisement

Advertisement

खरसुंडी येथे होणाऱ्या या सभेला स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारततात्या पाटील, पाणी चळवळीचे नेते आनंदरावबापू पाटील, स्वाभिमानी वंचितचे प्रमुख अरुणभाऊ वाघमारे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून या सभेसाठी खरसुंडी परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

राजेंद्रआण्णा देशमुख यांची सभा लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा

Tags :