ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

प्रवीण क्षीरसागर यांची निवड

12:34 PM Mar 11, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : शेटफळे ता.आटपाडी येथील प्रवीण क्षीरसागर यांची महाराष्ट्र नाभिक पश्चिम विभागीय प्रदेश युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार, माजी प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे, प्रदेश सरचिटणीस घनश्याम वाघ, पश्चिम विभागीय अध्यक्ष बाबासाहेब काशीद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मारुती आबा टिपूगुडे, सांगली जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष नितीन खंडागळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू वखरे, विनोद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

या नियुक्तीनंतर प्रवीण क्षीरसागर यांनी महामंडळाच्या युवक शाखेच्या कार्यासाठी नवे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल नाभिक समाजातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले असून आटपाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Tags :
प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजारप्रवीण क्षीरसागरमहाराष्ट्र नाभिक पश्चिम विभागीय प्रदेश युवक अध्यक्षमाजी प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे
Next Article