For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

मोबाईलवर स्टेट्‌सवर पाकचा झेंडा, तरुणास अटक

02:53 PM Apr 26, 2025 IST | Admin@Master
मोबाईलवर स्टेट्‌सवर पाकचा झेंडा  तरुणास अटक
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : सातारा : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यात 28 पर्यटकांना जीव गमवावा लागल्याने देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील जांभळी येथील तरुणास मोबाईल स्टेट्‌सवर पाकिस्तानचा झेंडा ठेवणे महागात पडले आहे. भारताविरोधी मजूकर आणि पाकिस्तानचा झेंडा मोबाईलवर स्टेट्‌स ठेवल्याने वाई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Advertisement

शुभम दशरथ कांबळे (वय 23, रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी फिर्याद दिली होती. वाई पोलिसांनी (Wai Police) शुभभ कांबळे ह्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहे.

Advertisement

पहलगाम हल्ल्यात देशभरातील 28 पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत, तर 22 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी भारताने पाकिस्तानचे (Pakistan) सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. तसेच, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे सरकारने दहशतावाद्यांचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानाला हिसका दाखवलेला असताना देशात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांना आम्ही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

पोलिसांनी केलेल्या तपासात शुभम कांबळे याने आपल्या मोबाईलवर वादग्रस्त स्टेट्स ठेवल्याचे दिसून आले.  पोलिसांनी शुभम कांबळे याला अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :