For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे तासगावचे आमदार रोहित आर.आर. पाटील मुख्य प्रतोदपदी तर ; गटनेतेपदी “यांना” संधी

06:57 PM Dec 01, 2024 IST | Admin@Master
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे तासगावचे आमदार रोहित आर आर  पाटील मुख्य प्रतोदपदी तर   गटनेतेपदी “यांना” संधी
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज /मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील (rohit patil) यांना मुख्य प्रतोदपदी संधी देण्यात आली आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ 49 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. त्यामध्ये, 20 जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर काँग्रेसने 17 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं.

Advertisement

Advertisement

महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळेल, एवढे संख्याबळ नाही. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता, मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

Advertisement

त्यानुसार, कळवा-मुंब्रा विधानसभेतून आमदार बनलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे गटनेते बनले आहेत. तर, मुख्य प्रतोदपदी दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना संधी देण्यात आली आहे.तसेच, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना प्रतोदपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

शिवसनेच्या निवडी
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तर, सुनील प्रभू यांना पुन्हा एकदा पक्षाचे प्रतोद बनविण्यात आले आहे. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Tags :