For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची नावे आली समोर ; 'यांना' मिळणार संधी

01:57 PM Dec 15, 2024 IST | Admin@Master
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची नावे आली समोर    यांना  मिळणार संधी
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला विस्तार आज नागपूर येथे संपन्न होणार आहे. या सरकारमध्ये भाजपचे २० शिवसेनेचे १० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. ज्यांना फोन गेले आहेत, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात आहे. परंतु मागील शिंदे सरकारमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठांना अजूनही फोन गेले नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आल्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement

बड्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांना अजूनही फोन आलेला नाही. तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनीही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

Advertisement

Advertisement

मंत्रिमंडळात या नावांची शक्यता

Advertisement

भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे

शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल

राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य

Tags :