For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

आटपाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या : आम्ही आंबेडकरवादी संघटनेची मागणी

01:50 PM Oct 17, 2024 IST | Admin@Master
आटपाडी उपजिल्हा रुग्णालयाला डॉ  बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या   आम्ही आंबेडकरवादी संघटनेची मागणी
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु असून, लवकरच काम पूर्ण असून रुग्णालय लवकर सुरु होणार आहे. या रुग्णालयाला भारतीय संविधनाचे निर्माते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ‘आम्ही आंबेडकरवादी’ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आटपाडीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

आटपाडी शहरामध्ये पूर्वी ग्रामीण रुग्णालय होते. शासनाने या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मंजुरी नंतर रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे. रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच काम पूर्ण होवून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ‘आम्ही आंबेडकरवादी’ संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, निवेदनावर सनी कदम, शैलेश ऐवळे, दत्ता ऐवळे, सनी पवार, योगेश पवार, चैतन्य कांबळे, सिद्धार्थ तोरणे,अभिषेक जावीर, सतीश जावीर यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :