ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

मुनीर शिकलगार यांची "या" संस्थेत फेलोशीपसाठी निवड

11:45 AM Mar 12, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : अग्रणी सोशल फौंडेशन,विटा या संस्थेचे सचिव, तसेच सांगली जिल्ह्यातील इतर पुरोगामी, परिवर्तनवादी व संविधानवादी संघटनांशी जोडून सक्रिय कार्य करणारे व कबीर, तुकोबा, शिव, फुले,शाहू, आंबेडकर, दाभोळकर,पानसरे यांच्या विचार, कार्य व साहित्याचा आदर्श मानून ते सामाजिक प्रबोधन चळवळीत पुर्णवेळ कार्य करणारे मुनीर शिकलगार यांची डिशोम फेलोशिपसाठी निवड झाली आहे.

 

 

 

 

मुनीर शिकलगार यांनी भटके विमुक्त जमातींच्या विकास, संघटन व क्षमता बांधणीसाठी ते प्रयत्न करत असूनही जाती पोटजातीमध्ये विखुरलेल्या भटक्या जमातीचे एकत्रिकरणासाठी सांगली जिल्हा भटके विमुक्त कल्याण समिती स्थापन केली आहे. शिकलगार हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तालुका विधीसेवक म्हणून गेली पाच वर्षे वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची डिशोम फेलोशिपसाठी निवड झाल्याने या तळमळीच्या कार्यकर्त्यांचा योग्य असा सन्मान झाला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

 

 

Tags :
Dishome Foundationअग्रणी सोशल फौंडेशनमुनीर शिकलगारविटासांगली जिल्हा भटके विमुक्त कल्याण समिती स्थापन
Next Article