For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

साहेबरावशेठ सारखी प्रेम करणारी माणसे माझ्यासोबत : आम. गोपीचंद पडळकर बनपुरीत नागरी सत्कार संपन्न

11:26 AM Jan 07, 2025 IST | Admin@Master
साहेबरावशेठ सारखी प्रेम करणारी माणसे माझ्यासोबत   आम  गोपीचंद पडळकर बनपुरीत नागरी सत्कार संपन्न
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : मला तिकीट मिळाल्यानंतर मी निवडून येणार म्हणून नवस बोलणारी साहेबरावशेठ पावणे सारखी माणसे माझ्याबरोबर आहेत. त्याचबरोबर ९० टक्के जनता माझ्या पाठीशी असल्याने १० टक्के वाल्यांचे काहीच शिजत नसल्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकावर केली. आमदार गोपीचंद पडळकर यांचा बनपुरी येथे बनपुरी ग्रामस्थ व साहेबरावशेठ पावणे मित्र परिवाराच्या वतीने नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

MLA Gopichand Padalkar conferred with civic honor in Banpuri

Advertisement

यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, महादेव पाटील, साहेबरावशेठ पावणे, जयवंत सरगर, यु.टी जाधव, नवनाथ पुकळे, संदीप ठोंबरे, रणजित ऐवळे, विष्णूपंत अर्जुन, सुरेश काळे, जगन्नाथ कोळपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, सध्याचे महायुतीचे सरकार हे गोरगरीब जनतेच्या हिताचे सरकार असून, प्रथमच राज्यातील आठरा पगड जाती जमातींसाठी स्वतंत्र बजेट अधिवेशनात मांडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. आतापर्यंतच्या सत्ताधारी नेत्यांचे राजकारण पै-पाहुण्यांच्या पलीकडे गेलेच नाही. राजकारण करत असताना समाजाच्या हिताची भूमिका घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे. २०१९ ला विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी राजकारनात नवीन असताना एका आमदाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण निश्चित बदलेल. विकासाच्या बळावर यापुढील राजकारण असणारा आहे.

Advertisement

90 टक्के जनता माझ्या पाठीशी असल्याने दहा टक्के वाल्यांचे काहीच शिजत नाही. युवकांनी राजकारणा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. राजकारणात प्रचंड ताकद आहे. राजकारणच परिवर्तन करू शकते. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्व ताकतीने लढवून चार जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी जनतेने ताकद देण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

ब्रम्हाशेठ पाय रोवून उभा, एक दिवस आमदार होणार

या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मी जत विधानसभा मतदार संघातून निवडून आलो असलो तर, खानपूर विधानसभा मतदार संघामध्ये विकासाच्या दृष्टीकोणातून काम करायचे आहे. या ठिकाणी ब्रम्हाशेठ पाय रोवून उभा आहे. तो एक दिवस आमदार होणारच म्हणाले.

Tags :