For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

दैनिक माणदेश एक्सप्रेस आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 सकाळच्या घडामोडी

10:03 AM Oct 18, 2024 IST | Admin@Master
दैनिक माणदेश एक्सप्रेस आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 सकाळच्या घडामोडी
Advertisement

▪️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता, 100 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना

Advertisement

Advertisement

▪️इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा लढणार

Advertisement

Advertisement

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महादेव जानकरांच्या रासपचा उमेदवार ठरला, संदीप चोपडे यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर

Advertisement

*विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा 260 जागांवरील तिढा सुटला, 20-25 जागांवर रस्सीखेच सुरुच

▪️झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा

▪️मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला, आता सरकार नाही, भेटीचा काय उपयोग? जरांगेंची प्रतिक्रिया

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड हाती लागलं

▪️माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यास सांगितले, शरद पवार गटात करणार प्रवेश करण्याची शक्यता

▪️नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग

▪️ बंगळुरुतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत गुंडाळला, 5 फलंदाज शून्यावर माघारी, दिवसअखेर न्यूझीलंडच्या 1 बाद 180 धावा

Tags :