For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

बोगस मतदान करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई होणार : निवडणूक आयोग प्रमुखांची राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ग्वाही

09:21 AM Nov 19, 2024 IST | Admin@Master
बोगस मतदान करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई होणार   निवडणूक आयोग प्रमुखांची राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ग्वाही
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्यूज : विटा : खानापूर मतदारसंघांमध्ये नवीन नाव नोंदणी करत असताना अनेक मतदारांची बोगस आधार कार्ड व मतदान ओळखपत्र बनवून ऑनलाईन मतदार नोंदणी करून पुरवणी यादीमध्ये सदर मतदारांची नावे समाविष्ट होऊन आली आहेत. याबाबत विटा शहराच्या मतदार यादी मध्ये भाग क्रमांक 63 मध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोगस नावे मतदान यादीत नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यांची नावे या यादीमध्ये नोंद झालेली आहेत त्या कुटुंबातील लोकांना आमिष दाखवून अल्पवयीन मुला मुलींची नावे नोंद करण्यात आलेली आहेत. हे प्रथमदर्शनी विटा शहरात 2200 बोगस नावे असल्याचे दिसून आल्याने सदर बोगस नावासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या वार्डामध्ये अशा बोगस मतदानाचा शोध घेऊन त्याबाबतचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मतदान दिवशी केंद्रावर असे बोगस मतदान करताना सापडल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते अशा बोगस नावाचा मतदारांचा शोध घेत आहेत. निवडणुका या लोकशाहीच्या आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत झाल्या पाहिजेत. आचारसंहितेला कुठे गालबोट न लावता शांततेत झाल्या पाहिजेत. त्यामध्ये बोगस नावे नोंद करून अगोदरच गुन्हा केलेला आहे परंतु मतदान करताना पुन्हा एकदा गुन्हा केल्यास त्याच क्षणी सदर व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोग प्रमुखांनी दिली.

Advertisement

Advertisement

बुधवार 20 नोव्हेंबर रोजी सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी चाळताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना आपल्या बूथमध्ये काही अल्पवयीन मुलं, मुली यांची बोगस वयाची पुरावे सादर करून समाविष्ट केलेली नावे निदर्शनास आल्यानंतर काहींचे पुरावे प्राप्त केले. त्यावेळी मतदार यादीत बोगस नावे असल्याची खात्री झाली. त्यामुळे सर्व विटा शहरातील याद्यांमध्ये अशा नावांचा शोध सुरू झाला. बरीच नावे बोगस कागदपत्रे उपलोड करून या याद्या मध्ये नोंद झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रांताधिकार्यांरना निवेदन देण्यात आले आणि मतदानादिवशी बोगस मतदान करण्यासाठी कोणी केंद्रावर येऊ नये असे आवाहन केलेले आहे.

Advertisement

कोणी बोगस मतदान करताना सापडला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार आहे. संपूर्ण खानापूर मतदारसंघातील बूथ वरील सर्व निवडणूक प्रतिनिधींना नम्र विनंती आहे की अशा प्रकारचे बोगस मतदान होत असताना आपल्या निदर्शनास आले तर आपण त्यावरती आपला आक्षेप नोंदवावा आणि तेथील मतदान केंद्राचे केंद्राध्यक्षांना सदर व्यक्तीची वयाबाबतचा पुरावा तपासून त्यावरती फौजदारी कारवाई करावी याबाबत विनंती करावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags :