ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

IPL 2025 : पंजाब किंग्सचा सलग दुसरा विजय ; कर्णधार श्रेयस अय्यरचा विजयी षटकार

07:44 AM Apr 02, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : आयपीएल 2025 स्पर्धेच्या 13 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सने दिलेलं आव्हान 17 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला.

कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यामुळे धावगती मंदावली. पॉवर प्लेमध्ये 4 गडी गमवून 39 धावा करता आल्या. 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं.

हे आव्हान पंजाब किंग्सने 17 व्या षटकात पूर्ण केलं. 2 विकेट गमवून पंजाब किंग्सने हे आव्हान गाठलं. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने 34 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 69 धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने विजयी षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारून नाबाद 52 धावा केल्या.

 

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन)

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

 

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)

मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई

Tags :
Cricketipl2025punjabking
Next Article