आटपाडीत बँक ऑफ महाराष्ट्रा समोर बेमुदत धरणे आंदोलन
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : गहाण नसलेल्या मिळकतीस जप्तीचा आदेश लागू करण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्र बँकेच्या आणि महसूल खात्याच्या विरोधात शहाजी यशवंत जाधव, मुरलीधर आप्पा पाटील, सुधाकर बापूराव सागर यांनी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या आटपाडी शाखेसमोरील बेमुदत धरणे आंदोलनास अरुण वाघमारे, बळीराजा संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख, हणमंतराव देशमुख यांच्यासह नेते, विविध संघटनांनी आणि नागरिकांनी पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, सावित्रीदेवी कॉटन आणि ऑईल मिल आटपाडी यांना दिलेल्या कर्जासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आटपाडी यांनी गट नं. २५/अ व २५/ब या मिळकतीचे गहाण खत २ डिसेंबर २०१७ रोजी केलेले आहे. बँकेने शेतजमिनीची वहिवाट असताना आम्हाला नोटीस दिली नाही. त्यामुळे आमचे मिळकतीवर जप्ती आदेश बेकायदेशीर आहे.
आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून, काल आंदोलकांशी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी भेट घेत आंदोलकांशी चर्चा केली.