For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

महाराष्ट्र केसरी पैलवानाच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा

03:59 PM Oct 22, 2024 IST | Admin@Master
महाराष्ट्र केसरी पैलवानाच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्ती कर विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. ऐन विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभिजीत कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

Advertisement

अभिजीत यांचे वडील चंद्रकांत कटके यांच्या वाघोलीतील घरात मंगळवारी सकाळी प्राप्ती कर विभागाचे अधिकारी पोहोचले होते. पथकाने कागदपत्रांची झाडाझडती घेत, कटके यांच्याकडे विचारपूसही केली. दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नातील असल्याची भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सासरे हे चंद्रकांत कटके आहेत. त्यांच्या घरी छपा टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे.

Advertisement

भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांना संबंधित मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्यासोबत चर्चा केली होती. बालवडकरांचे सासरे चंद्रकांत कटके यांचे वाघोलीत घर आहे. त्याठिकाणी छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :