ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

कामाचा जोरावरच भरघोस पाठिंबा : अमोल बाबर : आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार : लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने शिवसेनेत

04:03 PM Nov 05, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : स्वर्गीय आमदार अनिलभाऊंच्या आदर्श कामाच्या पद्धतीनुसारच आम्ही आज कार्यरत आहोत. याच आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. लोकांनी जे प्रचंड प्रेम दिले आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा मधयवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांनी केले.

आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य कल्लापा कुटे नाना, नवनाथ कुटे, अमोल शेठ कुटे यांच्यासह लोणार समाज बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना जाहिर पाठींबा दिला. यावेळी तुकाराम कुटे, लक्ष्मण कुटे, दिगंबर कुटे, अजिनाथ कुटे, बाळासो कुटे, अक्षय कुटे, गणेश कुटे, विकास कुटे, यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील पंच, राजेश नांगरे, मंथननाना मेटकरी, दिघंचीचे मा. सरपंच अमोल मोरे, उपसरपंच मुन्ना तांबोळी, पुजारवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, पूजारवाडीचे मा. सरपंच ब्रम्हदेव व्होनमाने, विकासराव मोरे, बाळासाहेब होनराव, माणिक नष्टे, श्रीरंग शिंदे, बाळासाहेब नळ, दत्ता जावीर, पांडुरंग महाराज मोटे, विष्णूपंत यादव, मनोज उंट, योगेश नष्टे, सुहास कडव, शेखर मिसाळ, महादेव पुसावळे, देवाप्पा पुसावळे, अनुप रावण, जीवन मोरे, भगवान माने, महादेव रणदिवे, महेश साळी, संजय वाघमारे, मुनीर तांबोळी, लिंगायत समाजाचे अध्यक्ष मुन्ना शेटे, नितीन सासणे, प्रशांत शेटे, राहुल पांढरे, सोमनाथ ढोले, दीपक रावण, शंतनु शेंडे, निलेश उंट, महेश नष्टे, फारूक मुलाणी आदी उपस्थित होते.

 

Tags :
amol baabr vitaAmol More Dighanchi SarpanchDighanchi NewsKhanapur Atpadi Assembly ConstituencyShivsena Eknath ShindeSuhas BabarTanaji Patil Atpadi
Next Article