अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुखला फाशी द्या : राजेंद्र खरात
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदनाद्वारे आटपाडी पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.
गेल्या आठ दिवसापुर्वी आटपाडी शहरातील नराधम संग्राम देशमुख याने शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने गाडीतून नेऊन तिच्यावर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ बनवून जीवे मारणेची धमकी देऊन पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या संग्राम देशमुख आणि त्याची साथीदार सुमित्रा लेंगरे या नाराधमास फाशीची शिक्षा व्हावी. गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे शासनाने अशी विकृत नराधमास तात्काळ जलद न्यायालयात खटला दाखल करून फाशीची शिक्षा करावी.
हे प्रकरण उजेडात येऊन आठ दिवस होऊन गेले तरी आटपाडी शहरातील तमाम आटपाडीकरांनी त्याचा जाहीर निषेध केला नाही याचे आश्चर्य.. खंत वाटते. हा नराधम काही दिवसांनी परत जेलमधून सुटून बाहेर येईल व काहीही झाले नसल्यासारखे वागून पुन्हा तोच धंदा करणार अशा नराधमांना कोण लगाम घालणार..?
आटपाडी शहरामध्ये अशा विकृत मनोवृत्तीची मानसिकता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अशा विकृतीस कायमस्वरूपी धडा शिकवून शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली सुरक्षित राहतील याबाबत पोलिसांनी दक्षता घेऊन तात्काळ फडक कारवाई करणेत यावी व शाळा, कॉलेज, बसस्थानक या परिसरामध्ये कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवणेत यावा.
सुजाण पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेतृत्व करणारी मंडळी यांनी पुढे येऊन अशा विकृतीस आळा बसावा याकरिता सर्व समाजातुन या विकृतीच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे. नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. व अशा प्रकारच्या नराधमास कायद्याने फाशीची शिक्षा करणेत अशा मागणीचे निवेदन पोलीस ठाणे आटपाडी यांना देण्यात आले.
यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, रणजित ऐवळे, भिकाजी खरात, विवेक सावंत, समाधान खरात, विशाल काटे, दीपक सावंत, रमेश खरात, मारुती ढोबळे, दस्तगीर शेख, नितीन तोरणे, विलास धांडोरे, नंदकुमार घोडके, अथर्व सावंत, रामचंद्र करडे, अमोल लांडगे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.