ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी तालुक्यातील चार ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

08:16 PM Sep 24, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे , विठ्ठलापूर, बोंबेवाडी, धावडवाडी या गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्ववर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना आदेश काढत योग्य ती कारवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आटपाडी तालुक्यातील जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात राखीव प्रवर्गातुन उमेदवार निवडून आले होते. परंतु निवडून आल्यावर सदर उमेदवारांनी एक वर्षाच्या आत त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु आजतागायत निवडून आलेल्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत जात प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आटपाडी तहसीलदार यांना आदेश दिला असून, शेटफळे , विठ्ठलापूर, बोंबेवाडी, धावडवाडी या गावातील चार सदस्यांनी अद्याप पर्यंत जात प्रमाणपत्र सादर ने केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

 

Tags :
धावडवाडीबोंबेवाडीविठ्ठलापूरशेटफळे
Next Article