ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती यांचे निधन 

02:24 PM Oct 16, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज :  आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती रूक्मिणीताई राजेंद्र खंदारे यांचे काल दिनांक 15 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

 

रुक्मिणीताई राजेंद्र खंदारे या आटपाडी पंचायत समिती गणामधून 2008 साली निवडून आल्या होत्या. निवडणुकी नंतर त्यांना आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने करत, आटपाडी तालुक्यातील महिला वर्गांना शिलाईRukmani khandare atpadi मशीन चे मोठ्या प्रमाणात वाटप केले होत त्याच बरोबर त्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गोर गरीब नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला होता.

 

काल दिनांक 15 रोजी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला होता. यांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु यांचे निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा माती सावडण्याचा कार्यक्रम आटपाडी येथील स्मशनभूमीत दिनांक 17 रोजी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

 

Next Article