ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! "या" पक्षात प्रवेश

11:39 AM Mar 10, 2025 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस/पुणे : काँग्रेसला महाराष्ट्रात धक्का बसला आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिलेला आहे. यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले.

 

 

 

रविंद्र धंगेकर म्हणाले, माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही. सत्तेत असल्याशिवाय कामं होतं नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही. काँग्रेस सोडताना मला दु:ख होत आहे, असंही धंगेकर म्हणाले. शिंदेसह काम करायला हरकत नाही, मी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नाही. मी कधी जात पात मानत नाही. सत्तेत जाऊन काम करण्याची इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे. याआधी शिंदे माझ्याबाबतीत बोलले आहेत. जो काही निर्णय होईल तो संध्याकाळी निर्णय होणार आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.

 

 

 

"काँग्रेस पक्षाचे मी नेहमी आभार मानतो, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन उमेदवारी दिली. काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले. एखादा पक्ष सोडणे खूप कठिण असतं. पण कार्यकर्ते आणि मतदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे यांनी मला या आधी दोन तीन वेळा फोन केला होता. उदय सामंत यांनीही मला फोन केला होता. आमच्यासोबत काम करा असं त्यांनी सांगितलं होतं. आज आमची भेट होणार आहे, यानंतर पुढचं सगळं ठरवणार आहे, असंही माजी आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. मी काँग्रेस पक्षावर कधीही नाराज नाही, त्यांनी मला भरपूर दिलं आहे, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले.

 

 

Tags :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकाँग्रेस पक्षमाजी आमदार रविंद्र धंगेकरशिवसेना शिंदे गट
Next Article