ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

राज्याचे माजी राज्यपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन

10:14 AM Dec 10, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : बंगळुरू : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांच मंगळवारी ( 10 डिसेंबर) निधन झाले. बंगळुरू येथील निवासस्थानी मंगळवारी 2.45 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला.

एसएम कृष्णा यांनी 11 ऑक्टोबर 1999 ते 20 में 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्याव्यतिरिक्त 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 दरम्यान ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते.

 

एसएम कृष्णा यांची कारकीर्द
एसएम कृष्णा यांचा जन्म 1 में 1932 साली कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मद्दुर तालुक्यातील सोमनहल्ली गावात झाला. त्यांचं पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लया कृष्णा असं होतं. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण हत्तूर येथे, माध्यमिक शिक्षण श्री रामकृष्ण विद्याशाळा, म्हैसूर येथून घेतलं. त्यानंतर म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी आणि आणि युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी पूर्ण केली.अमेरिकेतील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ आणि वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली.

एसएम कृष्णा यांनी 1962 मध्ये मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून निवडणूक राजकीय जीवनात प्रवेश केला आणि विजय मिळवला. यानंतर त्यांनी ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’मध्ये प्रवेश केला, परंतु 1967 च्या निवडणुकीत ते मद्दूरमधून काँग्रेसच्या एमएम गौडा यांच्याकडून पराभूत झाले.

 

1968 मध्ये विद्यमान खासदाराचे निधन झाल्यावर त्यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 1968 साली झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ते मंड्या मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1971 आणि 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला मंड्या हा मतदारसंघ वाचवण्यात एसएम कृष्णा यांची महत्त्वाची भूमिका होती.

Tags :
CM SM KrishnaFormer Foreign Minister SM Krishna passed awayFormer Karnataka CM SM KrishnaKarnataka CM SM Krishna
Next Article