ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांचे निधन

07:35 PM Oct 17, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगोला/प्रतिनिधी : आंबेडकर चळवळीतील प्रमुख, सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरज बनसोडे यांचे आज दिनांक १७ रोजी दु:खद निधन झाले.

सुरज बनसोडे (Suraj Bansode) यांनी  सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच ते आंबेडकर चळवळीमध्ये देखील त्यांनी मोठे काम केले होते. सांगोला शहरामध्ये त्यांची मोठी ताकद होती. अंगभर सोने घालून ते फिरत असल्याने त्यांना गोल्डनमॅन म्हणून देखील परिचित होते.

त्यांचे वजन जादा असल्याने त्यांना शारीरिक त्रास होत असल्याने त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज दिनांक १७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार करत, भाजपवर त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यांचे भाजपवर टीका करतानाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

.

Tags :
Former corporator Suraj BansodeSuraj Bansode passed awaySuraj Bansode SangolaSuraj Bansode sangole
Next Article