ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर ; सांगली जिल्ह्यात एकही उमेदवार पहिल्या यादीत नाही ; कुणाला संधी, कुणाला डावलले?

02:02 PM Oct 23, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 38 उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. परंतु या पहिल्या यादीत सांगली जिल्ह्यातील एकाही उमेदवाराला संधी मिळाली नाही.

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
बारामती- अजित पवार, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, अमरावती- सुलभा खोडके, इंदापूर- दत्तात्रय भरणे, पिंपरी- अण्णा बनसोडे, पाथरी- निर्मला विटेकर, मावळ – सुनील शेळके, येवला- छगन भुजबळ, कागल- हसन मुश्रीफ, सिन्नर – माणिकराव कोकाटे, श्रीवर्धन – अदिती तटकरे, उदगीर- संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, माजलगाव- प्रकाश सोळंखे, वाई – मकरंद पाटील, खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील, अहमदनगर – संग्राम जगताप, इंदापूर- दत्तात्रय भरणे, अहमदपूर- बाबासाहेब पाटील, कळवण- नितीन पवार, कोपरगाव- आशुतोष काळे, अकोले- किरण लहामटे, वसमत – राजू नवघरे, चिपळूण- शेखर निकम, जुन्नर- अतुल बेनके, मोहोळ- यशवंत माने, हडपसर- चेतन तुपे, देवळाली- सरोज अहिरे, चंदगड- राजेश पाटील, इगतपुरी – हिरामण खोसकर, तुमसर- राजू कारेमोरे, पुसद- इंद्रनील नाईक, नवापूर- भरत गावित, मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

 

पहिल्या यादीतून चार महिलांना संधी
अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत महिलांनादेखील संधी देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीतून सुलभा खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली. सरोज अहिरे यांना देवळाली, तर पाथरीतून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

Tags :
Ajit PawarMaharashtra Assembly Election 2024NCP Ajit Pawar
Next Article