For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

सांगोल्यात ‘देशमुख बंधू’ मधील वाद मिटला ; मेळाव्यात होणार उमेदवारीची घोषणा

11:09 PM Oct 22, 2024 IST | Admin@Master
सांगोल्यात ‘देशमुख बंधू’ मधील वाद मिटला   मेळाव्यात होणार उमेदवारीची घोषणा
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगोला : सांगोला विधानसभा निवडणूक कोणी लढवायची यावरून सांगोल्याचे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबात  मोठा अंतर्गत वाद सुरु होता. परंतु यात हा वाद मिटला असून, आज सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळावा संपन्न होत असून यामध्ये निवडणूक कोणी लढवायची याची उमेदवारी शेकापचे नेते जयंत पाटील हे जाहीर करणार आहे.

Advertisement

Advertisement

सांगोल्याच्या उमेदवारीसाठी स्वर्गीय गणपतरावांचे नातू डॉक्टर अनिकेत व डॉक्टर बाबासाहेब या दोन भावंडात सुप्त संघर्ष सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी  अनेक दिग्गजांनी  प्रयत्न केले होते. मात्र, हा दोघांमधील वाद मिटत नव्हता.  दरम्यान हा वाद संपण्यास आज शेवटी या दोघांची आजी श्रीमती रतनताई देशमुख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दोघांचे मनोमिलन घडवून आणले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याच घरात ही छोटी काही बैठक थोड्या वेळापूर्वी संपन्न होऊन श्रीमती रतन ताई यांनी दोघातले वाद संपवले. आता उद्या होणाऱ्या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्ष एक संघरतीने एकत्रित येत असून सांगोला विधानसभा पूर्ण ताकतीने लढवण्याची तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे हे एकत्र असूनही शहाजी बापू हे केवळ 768 मताने विजयी झाले होते . गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने आता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष एक संघ बनला असून आता शेतकरी कामगार पक्षाची लढाई शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे दीपक आबा साळुंखे यांच्यामध्ये होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले होते. गेल्या निवडणुकीत शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंखे एकत्र आल्याने शेतकरी कामगार पक्षाचा निसटता पराभव झाला होता. आता शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे हे दोघेही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने शेतकरी कामगार पक्षाला या वेळेला पुन्हा एकदा सांगोल्यावर लालबावटा फडकवण्याची संधी असणार आहे.

Advertisement

Tags :