ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

Jat Vidhan Sabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये आज सभा होणार !

09:18 AM Nov 06, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : जत : जत विधानसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis ) यांची जाहीर सभा आज दिनांक ०६ रोजी सकाळी १०.०० वाजता आर.एम. हायस्कूल जत येथे संपन्न होणार आहे.

जत विधानसभेसाठी भाजप मधून बंडखोरी झाली आहे. तम्मनगौडा रवी पाटील (Tammn Gouda Ravi Patil) यांनी भाजप मधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांचे पाठबळ रवी पाटील यांना आहे. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक, प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत (Vikram Savant) यांना पाठींबा दिला आहे.

या सगळ्या घडामोडीवर आज जत येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत असून बंडखोरांना या सभेमध्ये फडणवीस काय उत्तर देणार? याकडे लक्ष असेल. या मतदारसंघांमध्ये गोपीचंद पडळकर महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत रिंगणात आहेत. तमनगौडा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे जत विधानसभेला तिरंगी लढत होत आहे. भूमिपुत्राचा उपस्थित मुद्दा उपस्थित करून भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

 

Tags :
Deputy-Chief-Minister-Devendra-FadnavisDevendr_FadanvisGopichand PadalkarJat Vidhan SabhaMaharashtra Assembly Election 2024
Next Article