ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

काँग्रेसची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर ;  सांगलीतील उमेदवार ठरला

11:54 PM Oct 26, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.26) तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आज सकाळीच दुसरी उमेदवार यादी जाहीर केली होती. त्यानंतर आजच तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत 16 जणांना संधी देण्यात आली आहे. सांगलीतुन पुन्हा एकदा शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

यादीमध्ये राणा सानंदा – खामगाव, हेमंत चिमोटे - मेळघाट , मनोहर पोरेटी - गडचिरोली , दिग्रस - माणिकराव ठाकरे, नांदेड दक्षिण - मनोहर हंबर्डे , देगलूर - निवृत्तीराव कांबळे, मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, एजाज बेग - मालेगाव मध्य, शिरीष कुमार कोतवाल – चांदवड, लकीभाऊ जाधव – इगतपुरी, भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे , अंधेरी पश्चिम - सचिन सावंत, वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया, तुळजापूर - कुलदीप पाटील, कोल्हापूर दक्षिण - राजेश लाटकर, सांगली - पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.

मुखेड मतदासंघातून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना संधी देण्यात आली आहे. देगलूर मधून निवृत्ती कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. यापूर्वी देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. चांदवड विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष कोतवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल अशी लढत होणार आहे.

 

 

Tags :
Congress 3rd Candidate ListCongress Third list of 16 candidatesMaharashtra Assembly Election 2024Pruthviraj Pati SangliSangli Constituency
Next Article