For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; कुणा- कुणाला संधी?

12:10 PM Oct 26, 2024 IST | Admin@Master
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर   कुणा  कुणाला संधी
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

गणपतराव पाटील हे शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचे सुपुत्र आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिरोळची जागा काँग्रेसला  मिळावी यासाठी सतेज पाटील यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. शिरोळमध्ये आता अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर विरुद्ध काँग्रेसच्या गणपतराव पाटलांमध्ये सामना रंगणार आहे.

Advertisement

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
१. भुसावळ- राजेश मानवतकर

Advertisement

२. जळगाव, जामोद- स्वाती विटेकर

Advertisement

३. वर्धा- शेखर शेंडे

४. सावनेर- अनुजा केदार

५. नागपूर दक्षिण- गिरीश पांडव

६. कामठी- सुरेश भोयर

७. भंडारा- पूजा ठावकर

८. अर्जुनी मोरगांव - दिलीप बनसोड

९. आमगाव- राजकुमार पुरम

१०. राळेगाव- वसंत पुरके

११. यवतमाळ- अनिल मंगुलकर

१२. अरणी- जितेंद्र मोघे

१३. उमरखेड- साहेबराव कांबळे

१४. जालना- कैलास गोरंट्याल

१५. छत्रपती संभाजीनगर पूर्व- मधुकर देशमुख

१६. वसई- विजय पाटील

१७. कांदिवली पूर्व- काळू पडलिया

१८. चारकोप- यशवंत सी.

१९ सायन- गणेश यादव

२०. श्रीरामपूर- हेमंत ओघळे

२१. निलंगा- अभयकुमार साळुंखे

२२. शिरोळ- गणपतराव पाटील

२३. अकोट – महेश गणगणे

Tags :