ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू

10:55 PM Oct 12, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात झाला आहे. मुंबईतील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केले गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली होती. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. सदरची घटना ही आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्तदेखील रुग्णालयात दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली असून बाबा सिद्दिकी यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Tags :
Baba SiddiquiBaba Siddiqui has been shot
Next Article