ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

ब्रेकिंग : मोठी बातमी! सांगलीत भाजपच्या नेत्याची हत्या, कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून

01:19 PM Nov 09, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्यूज : सांगली : सांगलीत मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडेंची (Sudhar Khade Murder) हत्या झाली आहे. या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या खाडे भाजपच्या (BJP) उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते.

याबाबत अधिक माहिती अशी, मिरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

 

आज शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला.

कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडेयांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

 

 

 

Tags :
Sangli Newssudhakar khadeSudhakar Khade Mardar sangliSudhar Khade Murder
Next Article