For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

खरसुंडीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : सुहासभैय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार

03:06 PM Nov 18, 2024 IST | Admin@Master
खरसुंडीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश   सुहासभैय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : खरसुंडी : खरसुंडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. खरसुंडी ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. भाजपमधील नेत्यांसोबत काम करत असताना कार्यकर्त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही, ते आम्हाला कार्यकर्ते सुद्धा म्हणायला तयार नाहीत अशी परिस्थिती होती, मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करत असताना माझ्या समाजाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असल्याने शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी तानाजीराव पाटील म्हणाले, खरसुंडी तीर्थक्षेत्रासाठी अनिलभाऊंच्या माध्यमातून भरघोस निधी दिला आहे. खरसुंडी गावाला जोडणारे रस्ते रुंदीकरणासह अनेक कामे केली आहेत. दिवंगत आम. अनिलभाऊ बाबर यांच्या पश्चात मी सुहास बाबर यांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून उभा आहे. अनेक गावात पाठिंबा मिळत असून पक्षाची ताकद वाढत आहे. महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेण्याचा निर्णय तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी घेतला आहे असेही ते म्हणाले.

Advertisement

याप्रसंगी खरसुंडीचे माजी सरपंच दिनकर जावीर, चंद्रकांत पुजारी, अर्जुन पुजारी विजयकुमार भांगे यांच्यासह सुभाष माळी, निलेश पोमधरणे, सुरज कांबळे, आदिनाथ भिसे, शिवाजी भिसे, मारुती भंडारे, बनसी भिसे, राजेंद्र झोडगे, हिम्मत भिसे, काका भिसे, सुशांत चंदनशिवे, किरण भिसे उपस्थित होते.

Advertisement

मनोज कांबळे, खरसुंडी 

Advertisement

Advertisement

Tags :