ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

तासगावात राष्ट्रवादीचे मोठे शक्तिप्रदर्शन ; ट्रॅफिक जाम

01:11 PM Oct 24, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज/ तासगाव : आज तासगाव येथे युवा नेते रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केल्याने, आज तासगाव शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते.

 

तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून युवा नेते रोहित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तासगाव शहरातून मोठी पदयात्रा काढून तहसील कार्यालयासमोर त्यांची सभा संपंन झाली. पदयात्रा व सभेच्या माध्यमातून त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे आज सकाळ पासूनच तासगांव शहरात मोठे ट्रॅफिक जाम झाले होते.

 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातही ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. या मतदारसंघात सध्या स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्व. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातच आमदारकी राहिली आहे.

 

दरम्यान, आपल्या वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर रोहित पाटील पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्या विरोधात नेमके कोण आव्हान उभे करणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र विरोधक कोणीही असो... तो छोटा असो की मोठा असो... या निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास रोहित पाटील यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

 

Tags :
Rohit patil tasgaonRohit RR Patil
Next Article