ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! आषाढीतही मिळणार विठ्ठलाचे 2 तासात दर्शन, 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

08:15 AM Aug 18, 2024 IST | Mandesh Express

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्याप्रमाणे तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात टोकं दर्शनाची घोषणा केल्यानंतर शनिवारी यासाठीचा दर्शन मंडप आणि स्कायवॉक साठी राज्य सरकारच्या उच्यधिकार समितीने मान्यता दिली आहे. यामुळे आता पंढरपुरातील लांबच लांब दर्शन रांग इतिहासजमा होणार असून आषाढी एकादशीलाही भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी 110 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला असून आता पुढील महिन्याभरात या कामाला सुरुवात होऊ शकणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले .

यासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली अद्ययावत दर्शन मंडप उभारण्यात येणार असून येथून थेट मंदिरापर्यंत 1050 मीटर लांबीचा स्काय वॉक उभारण्यात येणार आहे. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन किंवा ऑफ लाईन आपले टोकन घ्यावे लागणार असून टोकन वर दिलेल्या वेळेपूर्वी अर्धातास या भाविकांना या प्रतीक्षा कक्षात पोचावे लागेल . यानंतर मोजून दीड ते दोन तासात हा भाविक थेट विठ्ठल -रुक्मिणीच्या मंदिरात या स्कायवॉक मधून चालत पोहचू शकणार आहे.

110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर-
आज याचा आराखडा मंजूर करण्यात आला असून या चार माजली दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छतागृहे , उपहारगृह , आरोग्य व्यवस्था तसेच विश्रांती कक्ष उभारले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. आता पुढील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा आराखडा अंतिम होऊन शासन निर्णय निघेल.

दर्शन रांगेतील सुविधा-
दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वेटिंग हॉल, दर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधा, रिफ्रेशमेंट, आपत्तीमध्ये बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगासाठी सुविधा, अग्नि विरोधक सुविधा, पोलीस, जेवणाची व्यवस्था, पार्किंगची सुविधा या बाबींचा समावेश आराखड्यात करण्यात आलेला आहे.

भाविकांना मोठा दिला मिळणार-
टोकण दर्शन व्यवस्थेनंतर आता भाविकांना केवळ दोन तासात पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारुन टोकण व्यवस्था केली जाणार आहे. सध्या दर्शनासाठी भाविकांना 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरु झाल्यानंतर 2 तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. यामुळे भाविकांना मोठा दिला मिळणार असल्याचं बोललं जातंय.

 

 

Tags :
Maharashtra GovermentPandharpurShri Vitthal Rukmini TempleShri Vitthal Rukmini Temple Pandharpurमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next Article