ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

मोठी बातमी : बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर? ; नेमंक काय घडलं?

09:27 PM Sep 23, 2024 IST | Admin@Master

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस जखमी झाला आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितले जात आहे.

 

अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते. सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.

 

अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. त्याने तीन राऊंड फायर केलं. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे.

 

दरम्यान, अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे. त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

 

 

Tags :
Akshay Shindebadalapur case
Next Article