ताज्या बातम्याआटपाडीमहाराष्ट्रसोलापूरसांगलीराजकीयमनोरंजनक्राईमराशिभविष्य

मोठी बातमी ! भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर गुन्हा दाखल

05:34 PM Nov 19, 2024 IST | Admin@Master

 

 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विनोद तावडे थांबलेल्या विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांची कॅश आढळून आली. विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटणार असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. त्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं.

 

दरम्यान आता या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमधील तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विरारमध्ये आज तुफान राडा झाला आहे. विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांची कॅश आढळून आली. त्यानंतर तब्बल साडेतीन तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे यांना घेराव घालण्यात आला होता.

 

याबाबत बोलताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. विनोद तावडे पैसे वाटणार असल्याची टीप आपल्याला भाजपमधूनच मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.

 

Tags :
vinod tawadevinod tawade news
Next Article