ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
माणदेश एक्सप्रेस न्युज/ माण : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे उर्फ दादा यांचे दीर्घ आजाराने आज दिनांक २५ रोजी पहाटे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे.
भगवानराव गोरे उर्फ दादा यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सौ. सुरेखा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना संस्कार देऊन त्यांनी घडविलेले होते. स्वर्गीय भगवान गोरे यांचे अंतिम दर्शन आज मंगळवार दि. २५ फेब्रुवारी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे. तर अंत्यविधी बोराटवाडी ता. माण, जि. सातारा येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.