For the best experience, open
https://m.mandeshexpress.page
on your mobile browser.

आटपाडी शुक्रवार दिनांक २० रोजी राहणार बंद ; ‘हे’ आहे कारण

11:08 PM Sep 17, 2024 IST | Mandesh Express
आटपाडी शुक्रवार दिनांक २० रोजी राहणार बंद   ‘हे’ आहे कारण
Advertisement

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे अल्पवयीन मुलीवर आरोपी संग्राम देशमुख याने लैंगिक अत्याचार केले असून सदर आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद असून याप्रकरणी आरोपी संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा व्हावी व त्याला साथ देणाऱ्या महिला आरोपी सुमित्रा लेंगरे हिच्यावर कठोर कारवाई व्हावी याबाबत शुक्रवार दिनांक २० रोजी आटपाडी करांच्या वतीने ‘आटपाडी बंद’ चे आवाहन करण्यात आले असून याप्रकरणी आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement

आटपाडी येथे जिम चालक असणाऱ्या संग्राम देशमुख याने त्याची सहकारी सुमित्रा लेंगरे हिच्या साथीने अल्पवयीन मुलीला चारचाकी गाडीमध्ये घालून, आटपाडी येथील तलावावर घेवून जात, त्याठिकाणी आरोपी संग्राम देशमुख याने बलात्कार करत लैंगिक अत्याचार केले होते.

Advertisement

Advertisement

तसेच सदर घटनेचे त्याने मोबाईल मध्ये शुटींग करत, त्याने सदर मुलीला धमकी देत, लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. परंतु आटपाडीकर आक्रमक झाले असून, आरोपी संग्राम देशमुख या वासनांध नराधमास फाशीची शिक्षा व्हावी व त्याच्या साथीदारांची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी मागणीसाठी शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी आटपाडी शहर बंद ठेवण्यात येणार असून, आटपाडी बस स्थानक ते पोलीस स्थानकापर्यंत संग्राम देशमुख सारख्या वासनांध नराधमास फाशीची शिक्षा व्हावी शिवाय त्याच्या साथीदारांची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी म्हणून शुक्रवारी सकाळी १०वा . आटपाडी बसस्थानकापासून पोलिस कचेरीवर मोर्चा निघणार आहे.

Advertisement

Tags :